दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक २४७ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदे...
of 1

Nashik news in marathi

Divyamarathi provides the all Nashik News , Sports News, breaking News, headlines in Marathi. Also find the complete coverage of top news headlines, Business News, international News, spritual News in Marathi.
Published on: Mar 3, 2016
Published in: News & Politics      
Source: www.slideshare.net


Transcripts - Nashik news in marathi

  • 1. दैिनक¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र ÎñçÙ·¤ÖæS·¤ÚUâ×êãU १४ राज्ये }५८ आवृत्त्यावर्ष ४ | अंक २४७ | महानगर }दैनिकभास्कर मध्य प्रदेश | छत्तीसगड | राजस्थान | नवी दिल्ली | पंजाब | चंदिगड | हरियाणा | हिमाचल प्रदेश | उत्तराखंड | झारखंड | जम्मू-काश्मीर | िबहार B गुजरात | महाराष्ट्र B महाराष्ट्र B गुजरात | राजस्थान } 7 राज्ये | 17 स्टेशन उद्या अंक नाही रंगपंचमीनिमित्त बुधवार, दि. ११ मार्च राेजी दै. दिव्य मराठी कार्यालयाला सुटी अाहे. त्यामुळे गुरुवार, िद. १२ मार्चचा अंक प्रकाशित हाेणार नाही. वाचक, वितरक व जाहिरातदारांनी याची नाेंद घ्यावी. - संपादक अापल्या शहरासह जगभरातील ताज्या बातम्या, घडामाेडी वाचण्यासाठी लॉग ऑन करा - divyamarathi.com नाशिक बुधवार, ११ मार्च २०१५ एकूण पाने १२+८=२० । किंमत ‌~३.५० सेन्सेक्स 28,709.87 मागील 28,844.78 सोने 26,750.00 मागील 26,830.00 चांदी 38,000.00 मागील 38,000.00 डॉलर 62.76 मागील 62.55 यूरो 67.48 मागील 68.02 सुविचार हार मानणे ही आमची सर्वात मोठी कमजोरी आहे. एक वेळ पुन्हा प्रयत्न करणे हा यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. - थॉमस अल्वा एडिसन न्यूजइनबॉक्स गुडन्यूज सीआयएसएफमध्ये १०,८०० जणांची भरती नवी दिल्ली | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यावर्षी १०,८०० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. सीआयएसएफचे महानिदेशक अरविंद रंजन यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत दलात ३-५ हजार जणांची भरती होत होती. शाहनवाज हुसेन बनवणार पैगंबरांचे संग्रहालय दुबई | भारतात पैगंबर मोहम्मद साहेबांचे संग्रहालय उभारण्याची इच्छा भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनी दुबईतील एका कार्यक्रमात व्यक्त केली. त्यांनी नासिर अल-जहरानी यांना भारतात असेच संग्रहालय स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. राहुल गांधी यांच्यावर खटला चालणार मुंबई | आपल्या विरोधातील मानहानीचा खटला रद्द करावा, अशी मागणी करणारा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी हा खटला दाखल केला आहे. छोट्या कारसाठी लागेल अाता दुप्पट विमा शुल्क नवी दिल्ली | छोट्या कारचा थर्ड पार्टी इन्शुरन्स १ एप्रिलपासून दुप्पट होईल. १ हजार सीसीपर्यंतच्या कारच्या प्रीमियममध्ये १०७.७९ टक्के वाढीचा इर्डाचा प्रस्ताव आहे. सध्या तो ११२९ रुपये असून, एप्रिलपासून २,३४६ रुपये होईल. दिव्यमराठीविशेष कर्नल सासऱ्याकडून मेजरचेच ‘काेर्टमार्शल’! काैटुंबिक कलहामुळे निधड्या छातीचा मेजर पती त्रस्त; घटस्फाेटासाठी घेतली न्यायालयात धाव मंगेश फल्ले | पुणे लष्करात कर्नल पदावर वडील असल्याने अापला पतीही लष्करातील अधिकारीच असावा, अशी एका तरुणीची इच्छा हाेती. त्यानुसार, तिने मेजर असलेला जाेडीदार शाेधून विवाह केला. मात्र, थाेड्याच दिवसांत ही तरुणी व तिच्या कुटुंबीयांनी मेजर पतीला मानसिक, शारीरिक, अार्थिक त्रास देणे सुरू केले. कर्नल सासराही पदाचा रुबाब दाखवत छळू लागला. त्यामुळे त्रस्त झालेल्या मेजरने अाता घटस्फाेटासाठी अर्ज केला अाहे. मयूर (नाव बदलले अाहे) हा तरुण लष्करात मेजर अाहे. चार वर्षांपूर्वी त्याचा नीलम (नाव बदलले अाहे) या शिक्षकेशी अांतरजातीय विवाह झाला. मयूरची अाई शास्त्रज्ञ, तर वडील उद्याेजक अाहेत. मयूर जम्मू-काश्मिरात असताना नीलमचे वडीलही तेथेच कर्नल हाेते. दाेन्ही कुटुंबीय पुणेकर असल्याने विवाह लवकरच जुळला. मात्र, थाेड्याच िदवसांत नीलम पती व सासरच्यांना तालावर नाचवू लागली. मयूर जम्मूत असल्याने त्याच्या अाई-वडिलांनी सुनेचे सर्व हट्ट पुरवले. मात्र, ती त्यांनाच अपमानास्पद वागणूक देऊ लागली. दारू िपणे, पाेर्न िफल्म पाहणे, रात्री उशिरा घरी येणे, पतीचे फाेन न उचलणे असे तिचे वागणे सुरू झाले. त्यामुळे घटस्फोटासाठी त्याने अर्ज केला आहे. संरक्षण मिळाले, पण गैरवापर टाळा ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुप्रिया काेठारी म्हणाल्या, कायद्याने महिलांना हक्क व संरक्षण िदले अाहे, मात्र त्याचा गैरवापर हाेता कामा नये. देशसेवेसाठी काम करणाऱ्यांसाठी कुटुंबीयांपेक्षा देश महत्त्वाचा असताे, ही बाब तरुणींनी लक्षात घ्यावी. घरातील ताण नसेल तरच लष्कर, पाेलिस दलातील व्यक्ती सक्षमपणे कर्तव्य बजावू शकताे. सासऱ्यानेच छळले जम्मूतील रक्त गाेठवणाऱ्या थंडीत सीमेवर मयूर काम करत हाेता. मात्र, अाई-वडिलांकडून नीलमचे ‘पराक्रम’ फाेनवर समजू लागल्याने त्याला मनस्ताप व्हायचा. त्यातच कर्नलपदी असलेला सासरा अापल्या पदाचा गैरवापर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने मयूरचा नाेकरीत छळ करू लागला. त्यामुळे मयूरने बदलीसाठी अर्ज केला. त्यानुसार, पश्चिम बंगालमधील िसलिगुडी येथे त्याची बदली झाली. नवी गाडी प्रायाेगिक तत्त्वावर दादर-भुसावळ रेल्वे धावणार १३ पासून प्रतिनिधी | नाशिकराेड राज्यातून रेल्वेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या नाशिकिवभागातीलप्रवाशांच्यामागण्यांकडेदुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने दादर-भुसावळ एक्स्प्रेस ही नवीन गाडी प्रायाेगिक तत्त्वावर अाठवड्यातून एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे. या गाडीला शुक्रवारी (दि. १३) दादर स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला जाणार असून, शनिवारी (दि. १४) भुसावळ येथून दादरकडे ितचा परतीचा प्रवास हाेईल. या गाडीला नाशिकराेडला थांबा असल्याने प्रवाशांना पंचवटीनंतर मुंबईहून नाशिकराेडला येण्यासाठी सुविधा प्राप्त हाेईल. प्रवाशांच्या प्रतिसादानंतर अाठवड्यातून तीन दिवस व नंतर ती नियमित सुरू हाेईल. या गाडीत सर्वसाधारण, तीन वातानुकूलित थ्री टिअर डबेही असतील. गाडी १३ मार्चला दादर स्थानकावरून रात्री ९.४५ वाजता सुटेल. नाशिकराेडला रात्री १२ वाजता, तर भुसावळला पहाटे ४ वाजता पाेहाेचेल. भुसावळहून सकाळी ८.३० वाजता सुटून नाशिकराेडला ११ वाजता, तर उर्वरित. पान १२ वृत्तसंस्था। नवी दिल्ली विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे नऊ दुरुस्त्यांसह वादग्रस्त भूसंपादन विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी सरकारने केलेल्या दुरुस्त्यांवर नाराजी व्यक्त करत सभात्याग केला. भूसंपादन कायद्यातून सामाजिक प्रभावाचे विश्लेषण आणि जमीन मालकांच्या सहमतीची तरतूद काढून टाकण्यावरूनवादहोता.केंद्रसरकारने हा मुद्दा आता राज्यांवर सोडला आहे. अकाली दलासह सरकारच्या अनेक मित्रपक्षांचा विधेयकातील काही तरतुदींना विरोध होता. अर्थमंत्री अरुण जेटली, संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू आणि ग्रामीण विकासमंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांनी सकाळी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक घेतली. त्यांना दुरुस्त्यांबाबतची माहिती दिली. त्यानंतर आमच्या ९५ टक्के मागण्या मान्य करण्यात आल्याचे अकाली दलाने सांगितले. बीजेडीनेही विधेयकावर सरकारला साथ दिली. चर्चा करूनच दुरुस्त्या : सरकार लोकसभेत सोमवारी या विधेयकावर चर्चा सुरू झाली होती. ग्रामीण विकासमंत्री वीरेंद्र सिंह यांनी मंगळवारी चर्चेला उत्तर दिले. ते म्हणाले की, समाजातील सर्व घटक, राजकीय पक्ष, उर्वरित. पान १२ भूसंपादन विधेयक ९ दुरुस्त्यांसह मंजूर आजचा सामना : श्रीलंका स्कॉटलंड सकाळी ९ पासून. {गांगुलीच्या नेतृत्वात ८ विजयांचा विक्रम धोनीने मोडला. विंडीजच्या लॉईडच्या विक्रमाशी बरोबरी. {धोनीच्या नेतृत्वात वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक १२ सामने भारताने जिंकले. कपिल देवच्या नावे ११ सामने जिंकण्याचा विक्रम होता. सर्वांत मोठी भागीदारी १७४धावा धवन- रोहितच्या वर्ल्ड कपमध्ये भारताची सर्वाधिक सलामीची भागीदारी. १९९६ मध्ये सचिन - जडेजाच्या १६३ धावा. ८४ चेंडूंत १०० वर शिखर २विक्रम पहिल्यांदा सलग ५ सामन्यांत विरोधी संघाला सर्वबाद करून भारत विजयी. पूल एमध्ये टॉपवर. यापूर्वी १९८७ मध्ये गटात टॉपवर भारताचा आयर्लंडवर 8 विकेटने विजय ५वा विजय ११ चौकार ५षटकार २६धावा धावून. {शिखरचे शतक. धवनचे ८ वे वनडे शतक. आठही वेळा भारत विजयी. ३३३धावा झाल्या धवनच्या या कपमध्ये. ३७२ धावांसह संगकारा पुढे आहे. १५ वेळा २०१३ नंतर ३ अथवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा शमी पहिला गोलंदाज ९ सलग विजय वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द मॅच पुढचा सामना गमावला तरी अव्वल आयर्लंड २५९ (४९) भारत २६०/२ (३६.५) भारताचा पुढचा सामना शनिवार, १४ मार्चला झिम्बाब्वेशी. पहिल्यांदाच पराभवाविना भारत टाॅपवर विशेष प्रतिनिधी | मुंबई नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला, जिल्ह्यात फिरण्यासाठी वेळ नाही. त्यांच्या भेटीमुळे शेतकऱ्यांना कुणीतरी आपल्याला विचारतोय, हा दिलासा मिळतो. त्यासाठीच त्यांची नियुक्ती हाेते. त्यांनी तत्काळ आपापल्या जिल्ह्यात जाऊन अापत्तीग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा असते. मात्र, पालकमंत्री गायब आहेत, ही बघा वर्तमानपत्रांची कात्रणे, असे म्हणत भुजबळांनी सभागृहात विविध वर्तमानपत्रांची कात्रणे दाखवली. केंद्राकडून शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे सांगून राज्यातील जनतेला मूर्ख बनवणे सोडा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च अशी कोणतीही मदत आता केंद्र सरकार करणार नसून, राज्याने त्यांना मिळणाऱ्या वाढीव निधीतूनच ती द्यावयाची आहे, असे राज्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाला सांगितले. त्यामुळे आता राज्य सरकारनेच राज्यातील शेतकऱ्यांना मदत करावी, असा टोला माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लगावला. द्राक्षाला एकरी ५० हजार द्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदतीसाठी ९०० ते १००० रुपयांचे धनादेश देऊन सरकारने त्यांची थट्टा केली. आम्ही हे धनादेश परत पाठवले. उर्वरित. पान १२ टीका छगन भुजबळ बरसले नाशिकमधून पालकमंत्री गायब, ही बघा कात्रणे नातेवाइकांसाठी मदतीची तरतूद दहापटीने वाढली मुंबई। अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आल्याचे सरकार मान्य करीत नसले, तरी सरकारने मंगळवारी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये अशा घटनांची संख्या हजाराच्या घरात जाऊ शकते, याची अप्रत्यक्ष कबुली िदली. त्यांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य देण्यासाठीची तरतूद कमी पडत असल्याचे सांगतानाच ती दहापटीने वाढविण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या वारसाला सरकारतर्फे एक लाखाची मदत दिली जाते. त्यासाठी ९५ लाखांची तरतूद मंजूर होती. मात्र, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पाच महिन्यांतच २०० उर्वरित. पान १२ मोदींचा बुरखा फाडणारमसरत सुटतो तर मग साध्वी प्रज्ञासिंह का नाही : पीठाधिश्वर महंत बिंदू महाराज यांचा सवाल सचिन वाघ | नाशिक शेकडो निरपराध नागरिकांच्या हत्येचा आरोप असणारा काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियतचा नेता मसरत आलम याला केवळ राजकीय लाभासाठी राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने सोडून िदले. एवढे घडूनही केंद्रातील भाजप नेतृत्वाची यावरील भूमिका संशयास्पद आहे. दुसरीकडे एकही आरोप सिद्ध झाला नसतानाही साध्वी प्रज्ञासिंहांसह अनेक साधू व देशभक्त तुरुंगात खितपत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होत आहे. केवळ आरोपांवरून जे साधू तुरुंगात खितपत आहेत, त्यांना सोडविण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहिणार अाहाेत. त्याबराेबर मोदी सरकारचा बुरखा फाडण्यासाठी युवा साधूंच्या माध्यमातून बंडाचे शस्त्र उपसले जाणार असून, हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी एका सक्षम आणि दिशा देणाऱ्या गुरूची गरज असल्याचे त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे प्रवक्ता पीठाधिश्वर महंत डाॅ. बिंदूजी महाराज ‘बिंदू’ यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. मसरतच्या सुटकेबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सोंग उर्वरित. पान १२ गोहत्या बंदीसाठी पत्र देशात गोहत्या बंदी होण्यासाठी तीन हजार शिष्य रोज पंतप्रधानांना पत्र पाठवत आहेत. कारण गायींची संख्या वाढणार नाही, तोपर्यंत विकास होणार नाही, असेही बिंदू महाराज म्हणाले. घरचा अाहेर | सरकार जनतेच्या मनातून ७५ टक्के उतरल्याची अामदारांची टीका शिवसेनेकडून काँग्रेसचे काैतुक; भाजपची काढली खरडपट्टीविशेष प्रतिनिधी | मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आमदारांनी मंगळवारी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. काँग्रेसच्या काळात तरी कापसाला जास्त भाव मिळत होता, असा घरचा आहेर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला, तर जळगाव िजल्ह्यातील आमदार गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मनातून हे सरकार ७५ टक्के उतरले आहे, अशा शब्दांत सरकारवर हल्ला चढविला. गुलाबराव पाटील यांनी सरकारवर हल्ला चढवीतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही शालजोडीतून चिमटे काढत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे पक्षपाताचा आरोप केला. पाटील यांचे भाषण अत्यंत आक्रमक झाले आणि विरोधकांनी बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. उत्तर महाराष्ट्रात मुलींची लग्ने थांबली आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या मनातून ७५ टक्के उतरले आहे. शेतकऱ्यांची संघटना नाही. उद्या सर्व शेतकरी एक झाले तर आमदारांना पळ काढावा लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला. अवकाळी पाऊस, दुष्काळ उर्वरित. पान १२ विराेधकांकडून सरकार धारेवर मुंबई | फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची घणाघाती टीका विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी केली. सविस्तर. पान ४ सत्तेवर येण्याअाधी राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून जेरीस अाणणारे नाथाभाऊ सत्तेवर अाल्यानंतर त्याबाबत ‘ब्र’ काढण्यासही तयार नाहीत. विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान निवांतक्षणी ते अजितदादांशी असे गप्पांमध्ये रंगले हाेते.

Related Documents